Type Here to Get Search Results !

shivaji maharaj ukhane in marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे खास मावळ्यांसाठी

 shivaji maharaj ukhane in marathi हे आपल्या खास बंधू भगिनी साठीच बनविले गेले आहेत. सर्व प्रथम रयतेच्या या राज्याला मानाचा मुजरा. राजाधिराज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे खास मावळ्यांसाठी बनविले गेले आहेत ते आपण पाहणार आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमांच्या गाथा खूप मोठ्या आहेत आपल्या देशासाठी त्यांनी खूप महान कार्य केले आहे. अशा या रयतेच्या राजाच्या कीर्ती व पराक्रमाला अनुसरून हे उखाणे बनविले गेले आहेत हे उखाणे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वापरू शकता. chhatrapati shivaji maharaj marathi ukhane जर तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत पाठवा तसेच काही चुकीचे आढळ्यास ते हि कळवा धन्यवाद.

Shivaji-Maharaj-Ukhane-In-Marathi

Table of content (toc)

किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी ...राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी


शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन घडविले ...रावांचे नाव घेण्यासाठी सगळ्यांनीच अडविले


साडेतीनशे वर्षानंतरही जिवंत आहे शिवशंभूच्या पराक्रमाचा इतिहास ...रावाचे नाव घेते तुमच्यासाठी खास


शिवरायांचे स्वराज्य संभाजीची दूरदृष्टी ...रावांच्या आगमनाने सुंदर वाटे दृष्टी


शिवरायांच्या माथ्यावर माता भवानीचा हात ...राव आणि माझी 1 सात जन्माची साथ


पराक्रमाची साथ देते मर्द मराठयांची तलवार ...रावांचे नाव घेते करून शिवरायांना नमस्कार


शिवरायांचे मावळे आम्ही भगव आमच रक्त ...रावांच नाव घेते मी शिवरायांची भक्त


तानाजीने दिली शिवाजीला स्वराज्याच्या लढाईत साथ ...नाव घेऊन रावांचे मी देते ह्यांच्या सुख दुःखात साथ


नववधूसाठी खास शिवाजी महाराज उखाणे


छत्रपतींच्या शौर्याच्या साक्षीदार आहेत सह्याद्रीच्या रांगा ...रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा


शिवरायांच्या मस्तकावर आहे भवानी मातेचा हात ...रावांची अशीच असू दे जन्मभर साथ


शिवाजी महाराजांचा युद्धामध्ये असे गनिमी कावा ...रावांना भेट देते कादंबरी छावा


छ. शिवाजी महाराजांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला ...रावांसारखे शिवभक्त पती लाभले माझ्या साथीला


Shivaji Maharaj Ukhane For Male and Female.


Shivaji Maharaj Ukahne For Male and Female हे अगदी सोपे आहेत. शिवाजी महाराज उखाणे हे खास आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे स्त्री- पुरुष सर्वजण वापरू शकता.Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane हे आपल्या भारतीय बंधू आणि भगिनींसाठी खास बनवले गेले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांचे उखाणे खास आपल्या मावळ्यांसाठी आहेत.



सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून नाद गर्जतो शिवशंभू राजा ...रावांचं नाव घेते जय जय महाराष्ट्र माझा


अंगात हवी रग रक्तात हवी धग ...राव म्हणतात एकदा जय शिवराय बोलून तर बघ


राजधानी रायगडाचे प्राचीन नाव म्हणजे रायरी ...रावांसोबत चढते मी मदिराची पायरी


जेजुरीचा खडेराया तुळजापुरची आदिशक्ती ...रावांसोबत करेन मी शिवरायांची भक्ती


धन्यजिजाऊ माऊली ज्या शिवबाच्या गुरू ...रावाचे नाव घेऊन उखाणा करते सुरू


छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ...रावांचे नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा


छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत ...राव हेच माझे सौभाग्य आहेत


शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती ...रावाची अन् माझी आहे सौभाग्याची प्रीती


सहयाद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे ...रावाचे नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे


छत्रपती शिवाजीराजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला ...रावांसारखे प्रेमळ पती मिळाले आयुष्यभर माझ्या साथीला


शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने ...रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने


शिवाजी महाराजांची होती सिंहाची चाल आणि गरूडाची नजर ...रावांचे नाव घेण्यास मी नेहमी हजर


शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान ...रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान


छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा ...रावांचे नाव घेऊन उखाणा करते पुरा


आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे / shivaji maharaj marathi ukhane हे नक्की आवडले असतील. जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही हे marathi ukhane shivaji maharaj ukhane marathi shivaji maharaj / chhatrapati shivaji maharaj marathi ukhane marathi ukhane navardevasathi shivaji maharaj आपल्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

Top Post Ad

Below Post Ad