कडक मराठी उखाणे:- उखाणे हि मराठी संस्कृतीला एक परंपरा आहे. आज हि परंपरा मराठी संस्कृतीची शान वाढवत असते. जेव्हा हि काही कार्यक्रम असतो जैसे- सत्यनारायण पूजा, मंगळागौरी आणि असे विविध सण साठी उखाणे घेण्याची पद्धत असते. म्हणून आम्ही खास महिलांसाठी भन्नाट मराठी उखाणे । Marathi Ukhane For Female Pujeche घेऊन आलो आहोत.मराठी संस्कृतीत विविध पूजेसाठी नाव घेतले जाते. जैसे लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश, सत्यनारायण, मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रम, गौरी गणपती, संकष्टी चतुर्थी,अंगारक चतुर्थी, आषाढी एकादशी, असे अनेक सणासाठी उखाणे घेऊन नाव घेतले जाते. म्हणून आम्ही विविध सण आणि पूजेसाठी भन्नाट उखाणे | Marathi Ukhane For Sanavar घेऊन आलो आहोत.makar sankranti ukhane
प्रत्येक सणाचे वेळी मराठी उखाणे
makar sankranti ukhane
कर्ता करविता ईश्वर त्याच्यावर टाकते भार ...रावांचे नाव घेते नौका लाव पार
कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता माझे सारे जीवन ....रावांकरीता
सासूबाई माझ्या प्रेमळ सासरे माझे दयाळू ... राव तर आहेत अतिशय मायाळू
द्वारकेत श्रीकृष्ण अयोध्येमध्ये राम ...च्या पायांशी माझे चारही धाम
माहेरची माया अन माहेरची साडी... रावांची अन माझी जमली जोडी
नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ...रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा
श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली... रावांच्या सुखासाठी मंगळागौर मी पुजली
श्रावण सरला वाजत गाजत गणपती आले दारात ...रावांचे नाव घेऊन आणते गौरी घरात
तीलगुळाच्या देवघेवीनं दृढ प्रेमाचं जुळतं नातं ...रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत
रूप गुण संपदेच्या जोडीला हवं चारित्र्य... रावांच्या नावात आहे पावित्र्य
स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी... रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी
चंद्र मराठीत चाँद हिंदीत इंग्रजीत म्हणतात मून ...रावांचे नाव घेते मी... सून
महाविष्णूच्या मस्तकावर डोलत असतो शेष ...रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश
कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता माझे सारे जीवन ...रावांकरीता
सौभाग्याची जीवनज्योत प्रीततेलाने तेवते ...रावांना मी दीर्घायुष्य मागते
साता जन्माच्या जुळल्या गाठी ...रावांच नाव घेते चालताना सप्तपदि
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे .... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी ....रावाची आहे मी अर्धागीनी
मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले आजच्या दिनी ..... च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले
नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे ...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे ...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे
चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी ..... च्या बरोबर केली सप्तपदी
फुल आहे गंध भाव आहे अंतरी ...सह चालले सातपावलांवरी
उंबरठयावरचं माप पायांनी लोटते ... रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले म्हणून ...रावांची मी सौभाग्यवाती झाले
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ... रावां समवेत ओलांडते माप
makar sankranti ukhane
मकर संक्रांती साठी मराठी उखाणे
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ... नाव घेते सोडा माझी वाट
हिरव्या शालुला जरिचे काठ ...चे नाव घेते सोडा माझी वाट
नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले ... रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले
जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज ...च नाव घेऊन गृहप्रवेश करते आज
लग्न झाले आता आमची बहरू दे संसारवेल …च नाव घेते वाजवून ...च्या घराची बेल
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ...बसले दारात मी जाऊ कशी घरात
makar sankranti ukhane
नवय्रासाठी नवीन लग्नाची मराठी उखाणे
मनी माझ्या आहे,सुखी संसाराची आस..तू फक्त मस्त गोड हास
हो नाही म्हणता म्हणतालग्न जुळले एकदाचे ...मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे
माधुरीच्या अदा कतरीनाच रूप ...ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप
...माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल तुमच्या येण्यानं झाला दिवस एकदम स्पेशल
makar sankranti ukhane मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू साठी मराठी उखाणे
...च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट ...ला पाहून पडली माझी विकेट
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला ...रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला
निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी ...स वाटे ...रावांचे नाव घ्यावे
श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान ...रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान
संकष्टी चतुर्थी साठी मराठी उखाणे
संथ वाहती गंगा यमुना आणि सरस्वती ...रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती
जीवनात ही घडी अशीच राहू दे ...रावांचे प्रीतफुल असेच हसु दे
शरदाचे चांदणे मधुवनी फुले निशी़गंध ...रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद
अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा ...रावांच्या नावाचा भरते लग्नचुडा
दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र ...रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र
वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर ...रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर
सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा ...रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा
थोर कुळांत जन्मले सुसंस्कारात वाढले ...रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती ...रावांना ओवाळते मंगल आरती
...रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
आई बाबा येते आशीर्वाद दयावा ...रावांचा सहवास जन्मभर लाभावा
कसे वाटले हे आमचे नवरी व नवय्रासाठी नवीन लग्न झालेल्या मुली व मुलां करीता लिहिले आहे हे मराठी उखाणे तुम्ही प्रत्येक सणाच्या वेळी घेवु शकता या मध्ये गृह प्रवेश करताणा व सप्तपदी मराठी उखाणे या मराठी उखाणे तुम्हाला कधीही उपयोगी ठरेल त्यामुळे हे मराठी उखाणे तुम्ही पाठांतर करून ठेवले पाहिजे पुन्हा भेटुयात अशेच नविन मराठी उखाणे घेऊन तो पर्यंत बघत रहा कडक मराठी उखाणे या वेबसाईटला मराठी उखाण्यांची नंबर १ वेबसाईट तुम्ही आमचे मकर संक्रांत मराठी उखाणे बघितले नसतील तर येथे टच करून ते नक्की वाचा .
धन्यवाद