Type Here to Get Search Results !

तुळशी विवाह ची संपुर्ण माहीती tulsi vivah details in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण तुळसी विवाह मुहूर्त या tulsi vivah details in marathi विषयि महिती बगणार आहे  दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह (Tulsi Vivah )हा  उत्सव साजरा केला जातो.  त्यानुसार (2023) या वर्षी मध्ये 24 नोव्हेंबरला तुळशीविवाह आहे. याच्या एक दिवस आधी देवउठी एकादशी आहे. याला कार्तिकी एकादशीसुद्धा म्हणतात. या दिवशी पंढरपूच्या कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जगाचा रक्षक भगवान विष्णू दुग्धसागरात जागृत होतो, असे शास्त्रात नमूद केले आहे. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये केली जातात. यामध्ये लग्न,एंगेजमेंट, मुंडन, निरोप इत्यादी सर्व कार्यांचा समावेश होतो. ज्योतिषांच्या मते तुलसी विवाहाच्या दिवशी एकाच वेळी अनेक शुभ योग तयार होत आहेत. चला, शुभ मुहूर्त आणि सिद्धी योग जाणून घेऊया.


तुळशी विवाह लग्न पत्रिका 

Tulsi-Vivah-Lagn-Patrika


शुभ मुहूर्त
(2023) तुलशी विवाह सोहळा.
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 09: वाजुन् 01 मिनिटानी  सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 07:वाजुन् 06 मिनिटानी  समाप्त होईल. त्यामुळे तुळशीविवाहाचा उत्सव 24 नोव्हेंबर रोजी  साजरा होणार आहे.

सिद्धी योग

तुलसी विवाहाच्या दिवशी सिद्धी योग तयार होत आहे. हा योग सकाळी 9.वाजुन् 05 मि. पर्यंत आहे. यानंतर व्यतिपात योग तयार होत आहे. व्यतिपात योगामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

Tulsi Vivah: २३ की २४ नोव्हेंबर, तुळशीचा विवाह नेमका कधी? तारखेचं कन्फ्यूजन लगेच करा दूर


तुळशी विवाह मंगलाष्टक
Tulsi Vivah Marathi Mangalashtak Lyrics,mangalashtak lyrics in Marathi,Mangalashtak Meaning in Marathi
तुळशी विवाह च्या वेळी या मंगलाष्टक चा वापर करा.

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव
विद्याबलं दाोवबलं तदेव
लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि
सुमुहूर्त शुभमंगल सावधानsss

तुळशी विवाह च्या दिवशी तूमच्या घरी दारात किंवा तुळशी माता पाशी या मधील रांगोळी काढा 🙏

Tulsi-Vivah-Rangoli

Tulsi-Vivah-Rangoli

Tulsi-Vivah-Rangoli

Tulsi-Vivah-Rangoli

Tulsi-Vivah-Rangoli

Tulsi-Vivah-Rangoli

तुळशी विवाह च्या दिवशी तूमच्या हातावर या मधील मेहंदी काढा  🙏

Tulsi-Vivah-Mehandi

Tulsi-Vivah-Mehandi

Tulsi-Vivah-Mehandi

FAQ

तुळशी चा नवरा कोण आहे?
तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.

तुळशीचे लग्न का करतात?
तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.

Top Post Ad

Below Post Ad